जळगाव: उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांच्या उत्साहाला उधाण; इच्छुकांची महापालिका कार्यालयात मोठी गर्दी
जळगाव महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ शेवटचे दोन दिवस उरले असल्याने, इच्छुकांची प्रचंड धावपळ पाहायला मिळत आहे. आज, सोमवार २९ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासूनच महानगरपालिकेच्या प्रशासकीय इमारतीत संभाव्य उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र दिसून आले.