अंबाजोगाई शहरातील महादेव मंदिराजवळील मुकुंदराज रोड, गांधीनगर भागात राहणारे चेतन भालेराव यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना उघडकीस येताच परिसरात खळबळ उडाली असून स्थानिकांमध्ये शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन भालेराव यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिले. याची माहिती तत्काळ पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.