हिंगणघाट: लसपुर हरिओम बाबा गोशाला आश्रम ट्रस्ट येथे हरीओम बाबाची ३१ वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साह साजरा
लसनपुर येथील हरिओम बाबा गोशाला आश्रम ट्रस्ट येथे शिवस्वरूप हरिओम बाबा यांच्या ३१ व्या पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या महोत्सवात आमदार समिरभाऊ कुणावार, सहकार नेते ॲड सुधिरबाबू कोठारी, जिल्हा पोलीस अधिकारी अनुराग जैन, सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ मडमवार, आदींनी हजरी लावली यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार यांनी हरीओम बाबाचे दर्शन घेतले त्याचबरोबर गोशाळेत जाऊन गोमातेचे पूजन व दर्शन केले तसेच त्यांची सेवा केली. यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.