डहाणू नगरपरिषद निवडणुकीसाठी मार्क्सवादी कम्युनिष पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष महाविकास आघाडीच्या वतीने शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले. डहाणू प्रांत कार्यालय येथे माकपच्या कल्पिता तुंबडे, शिवसेना ठाकरे गटाचे संजय पाटील व वासू तुंबडे यांचे उमेदवारी अर्ज मोठे शक्ती प्रदर्शन करत दाखल करण्यात आले. यावेळी माकपचे डहाणूचे आमदार विनोद निकोले, शिवसेना ठाकरे गटाचे पदाधिकारी व महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.