सातारा: दादासाहेब गायकवाड योजनेतील जाचक अटी रद्द करा; गायरान जमीन व महामंडळ योजनांत सुधारणा करा – पुरोगामी संघर्ष परिषदेची मागणी
Satara, Satara | Dec 19, 2025 कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमानी सबलीकरण योजनेतील जाचक अटी तात्काळ रद्द कराव्यात, तसेच गायरान जमीन वाटप व मागासवर्गीय महामंडळाच्या योजनांमध्ये आवश्यक सुधारणा कराव्यात, या प्रमुख मागण्यांसाठी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या वतीने आज शुक्रवार, दिनांक 19 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी शासनाच्या धोरणांमुळे वंचित व मागास घटकांना होणाऱ्या अडचणींचा तीव्र निषेध केला. संबंधित योजनांतील अटी सामान्य लाभार्थ्यांना अन्यायकारक ठरत असून, त्या सुलभ व लोकाभिमुख कराव्यात अशी मागणी करण्यात आली.