मावळ: आई एकवीरा देवी मंदिरात घटस्थापना उत्साहात
Mawal, Pune | Sep 22, 2025 नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी वेहेरगाव, कार्ला येथील आई एकवीरा देवी गडावर तसेच खंडाळा येथील वाघजाई देवी मंदिरात घटस्थापना उत्साहात करण्यात आली. परिसरातील सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांच्या वतीने देवीच्या मूर्तींची ढोल-ताशांच्या गजरात वाजत-गाजत मिरवणुका काढत विधिवत व पारंपरिक पद्धतीने प्रतिष्ठापना करण्यात आली.