उदगीर: अवलकोंडा ग्रामपंचायतीसमोर मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांनी टाकली लाकडे, स्मशानभूमी नसल्याने मराठा समाजाचा संताप
Udgir, Latur | Jun 14, 2025 उदगीर तालुक्यातील अवलकोंडा येथे सोपान बिरादार यांचे दुःखद निधन झाले, सोपान बिरादार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी गावात मराठा समाजासाठी स्मशान भूमी नसल्याने मयतावर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांनी १४ जून रोजी चक्क ग्रामपंचायत कार्यालया समोरच लाकडे टाकून मयतावर अंत्यसंस्कार करणार असल्याचा संताप व्यक्त केला यावेळी उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर,मंडळ अधिकारी,तलाठी यांनी स्मशान भूमी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले