नेवासा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील भुकरमापक वर्ग ३ तथा उपअधिक्षक अजयभानसिंग गुलाबसिंग परदेशी यांना दीड लाखांची लाच स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक पथकाने रंगेहाथ पकडले.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ४ डिसेंबर २०२५ रोजी पंचासमक्ष सापळा रचला असता, परदेशी यांनी मागितलेली रक्कम स्विकारली आणि त्याचक्षणी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.