कारंजा तालुक्याचा तालुकास्तरीय कब बुलबुल उत्सव दिनांक 30 डिसेंबर 2025 रोजी झील इंटरनॅशनल स्कूल कारंजा येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या उत्सवाचे उद्घाटन झील इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष शार्दुल मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघटक के एल पवार, मुख्याध्यापिका कुमारी अभिलाषा बासुळे, रेखा कापुरे, काजल पवार, मोहम्मद इक्तेखार हुसेन, विठ्ठल भुसारे, ज्येष्ठ स्काऊट मास्टर गोपाल काकड, श्रीकांत देशपांडे, प्रशांत इंगळे निलेश मिसाळ, प्रीता भोंगाडे इत्यादींची उपस्थिती होती.