वन्यप्राण्यांचा धुमाकूळ वाढत असून, मांढळ शेतशिवारात वाघाने केलेल्या हल्ल्यात एका गाभण शेळीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गजानन पुरी नामक शेतकरी आपल्या शेळ्या शेतशिवारात चराईसाठी घेऊन गेले असता, दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक हल्ला चढवून शेळीला ठार केले. मृतक शेळी गाभण असल्याने पीडित शेतकऱ्याचे अंदाजे २० हजार रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे.