मुंबई: अधिछात्रवृत्तीसाठी आझाद मैदानात बेमुदत साखळी उपोषण सुरू; संशोधक विद्यार्थ्यांची सरकारवर नाराजी
Mumbai, Mumbai City | Feb 20, 2024
पीएचडी मध्ये नोंदणी होऊन दोन वर्षांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. मात्र अद्याप शासनाकडून अधिछात्रवृत्ती बाबत काहीच भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे बार्टी, सारथी, महाज्योती संस्थेकडे अर्ज केलेले गरजवंत उमेदवारांनी संयुक्तरीत्या मुंबईतील आझाद मैदानात (ता.19) फेब्रुवारी पासून शिवजयंतीनिमित्त आधी महाराजांना अभिवादन करून आझाद मैदानात संयुक्त बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाचा मंगळवार, (ता.२०) फेब्रुवारी रोजी दुसरा दिवस सुरू आहे.