आमगाव: बोरकन्हार येथे भावाकडून भावाला मारहाण,आमगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Amgaon, Gondia | Sep 22, 2025 आमगाव पोलिस ठाणे हद्दीतील बोरकन्हार गावात कौटुंबिक वादातून सख्ख्या भावामध्ये झालेल्या भांडणात मोठी दुखापत झाल्याची घटना २१ सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी आमगाव पोलिसांनी गंभीर दुखापतीचा गुन्हा दाखल केला आहे.चुन्नीलाल दादी पारधी (३६) रा. बोरकन्हार, ता. आमगाव हे २१ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ ते ५:३० वाजता मजुरीचे काम करून घरी परतले. आंघोळीनंतर त्यांनी आईकडे जेवण मागितले असता आई म्हणाली की, थोडा वेळ थांब. त्याचवेळी आरोपी गुनीलाल दादी पार