एमएसईबीमध्ये चारचाकी वाहन कायमस्वरूपी भाडेतत्त्वावर लावून देण्याचे आमिष दाखवून वाहनचालकाची फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकरोडच्या जेलरोड परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमएसईबीमध्ये वाहन लावून देतो, असे सांगत ५० हजारांची मागणी करून वाहनचालकाची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी राजेंद्र भिका खैरणार (रा. जेलरोड, नाशिकरोड) याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.