नंदुरबार: कोठली गावात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचे आ डॉ विजयकुमार गावित यांच्या हस्ते शुभारंभ
नंदुरबार तालुक्यातील कोठली या गावी आमदार डॉ विजयकुमार गावित यांच्या प्रमुख उपस्थितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉ कुमुदिनी गावित डॉ सुप्रिया गावित मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल जिल्हा परिषद सदस्य जयश्री गावित उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत उदय कुसुरकर गटविकास अधिकारी अनिल बिराडे सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आर डी पवार आदी उपस्थित होते.