चिखली: राष्ट्रीय बेरोजगार दिनी चिखलीत जयस्तंभ चौक येथे युवक काँग्रेसतर्फे अनोखे आंदोलन
सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील २ कोटी युवकांना रोजगार देण्याची हमी दिली होती. प्रत्यक्षात मात्र देशात युवकांच्या बेरोजगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत.उच्च शिक्षण घेऊनही हातात नोकरी नसल्याने युवकांना चहा,वडापाव, फळांची दुकाने टाकावी लागत आहे. युवकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त चिखली शहर व तालुका युवक काँग्रेसतर्फे 17 सप्टेंबर रोजी चिखली येथील जयस्तंभ चौकात राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा.