शिरपूर: तालुका अतिवृष्टीग्रस्त घोषित करावा अन्यथा दिवाळीनंतर विराट मोर्चा, तहसील कार्यालयात निवेदन देत शिरपूर फर्स्टचा इशारा
Shirpur, Dhule | Oct 17, 2025 ,शिरपूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक शेतकऱ्यांचे पिके पूर्णतः नष्ट झाली आहेत. या पार्श्वभूमीवर “शिरपूर तालुक्याला अतिवृष्टीग्रस्त घोषित करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी” या व विविध मागण्यांसाठी शिरपूर फर्स्ट संघटनेच्यावतीने 17 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2 वाजेच्या सुमारास शिरपूर तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.तसेच मागण्या मान्य न झाल्यास दिवाळीनंतर आंदोलनाचा इशारा ही निवेदनातुन देण्यात आला.