वाई: वाई मांढरदेव रस्त्याची पाहणी शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी अभियंत्यांसोबत केली
Wai, Satara | Sep 16, 2025 वाई तालुक्यातील वाई ते मांढरदेव या रस्त्याची दुरावस्था झाली असून रस्त्याचे काम अपूर्ण आहे. त्या रस्त्याची पाहणी सार्वजनिक बांधकाम विभाग भोर यांच्याकडे असल्याने पाठपुरावा उबाठाच्यावतीने करण्यात आल्याने या रस्त्याची पाहणी करण्यात आल्याची माहिती उबाठाच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी दुपारी १२.३० वाजता दिली. यावेळी वाई शहर प्रमुख गणेश जाधव, उपशहर प्रमुख योगेश चंद्रस, मांढरदेव विभाग प्रमुख गणेश किर्दत आदी उपस्थित होते.