वाशिम: सेवा पंधरवड्यात विविध शासकीय सुविधांचा सर्वसामान्यांनी लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन
Washim, Washim | Sep 17, 2025 वाशिम जिल्ह्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान विविध उपक्रम राबवून तीन टप्प्यात ‘सेवा पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. यात विविध उपक्रमांची प्रभावी अमंलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती, जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दि. 17 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात दिली.