उमरेड: वेना नदीमध्ये बुडून शेतकऱ्याचा मृत्यू, पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद
Umred, Nagpur | Sep 16, 2025 काल नागपूर जिल्ह्यात पाण्याने दमदार हजेरी लावली दरम्यान वडगाव जलाशयातून पाणी सोडल्यामुळे वेना नदीचा जलस्तर अचानक वाढला यामध्येही एका शेतकऱ्याचा बुडून मृत्यू झाला. मृतक शेतकऱ्याचे नाव राजेश तराळे वय 52 वर्ष असे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार राजेश हे त्यांच्या बैलांना पाणी पाजण्यासाठी वेना नदीवर गेले होते. दरम्यान ते पाय घसरून नदीत पडले.