रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार तसेच राज्याचे राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांचे जनसंपर्क कार्यालय रामटेक येथे सोमवार दिनांक 20 सप्टेंबरला सकाळी दहा ते दुपारी दोन वाजता पर्यंत आयोजित जनता दरबार व जनसंवाद कार्यक्रमातून रामटेक विधानसभा क्षेत्रासह अनेक क्षेत्रातून आलेल्या नागरिकांच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले. यावेळी दिवाळीनिमित्त सदिच्छा भेट देणाऱ्यांची ही बरीच मोठी संख्या होती.