पुसद: जिल्ह्यात हरभरा बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना संधी अनुदानासह वितरण सुरू
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान – कडधान्य (२०२५-२६) अंतर्गत शेतकऱ्यांसाठी हरभरा प्रमाणित बियाण्यांचे अनुदानित दरात वितरण सुरू करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत १० वर्षांच्या आत विकसित वाणांसाठी ५ हजार रुपये प्रति क्विंटल, तर १० वर्षांहून जुने वाण असलेल्या बियाण्यांसाठी २ हजार ५०० रुपये प्रति क्विंटल इतके अनुदान देण्यात येणार आहे.