वर्धा: शहरातील युसीएन केबल नेटवर्कच्या ऑफिसला भीषण आग; रात्री १० वाजता लागली मोठी दुर्घटना
Wardha, Wardha | Oct 21, 2025 वर्धा शहरात असलेल्या Ucn केबल नेटवर्कच्या ऑफिसला रात्री10 वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे.Ucn केबल नेटवर्कचं ऑफिस हे कुमारआप्पा मार्गावर RTO ऑफिसजवळ असलेल्या एका अपार्टमेंटच्या वरच्या मजल्यावर नेटवर्कचे कार्यालय आहे. आज 21 ऑक्टोबर रोजी रात्री साधारण 10 वाजताच्या सुमारास या ऑफिसमधून अचानक धुराचे लोट बाहेर पडू लागले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि आगीच्या मोठ्या ज्वाला इमारतीतून बाहेर येताना दिसल्या. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे