चिखली: मंगरूळ नवघरे येथे बिबट्याचा धुमाकूळ, शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण
मंगरूळ नवघरे शिवारात बिबट्याने उच्छाद मांडल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.शेतकरी प्रदीप पुंडलिक जाधव यांच्या शेतात राखणीसाठी बांधून ठेवलेल्या कुत्र्यावर बिबट्याने झडप घालून त्यााला झाडावर ओढत नेऊन ठार केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सदर बिबट्या मुक्तपणे शिवारात संचार करत असल्यामुळे पिकांची राखण करणारे शेतकरी व काम ासाठी येणारे शेतमजूर भीतीनेग्रस्त झाले आहेत.