समुद्रपूर: ४५ वर्षांची अखंड परंपरा: अड्याळ टेकडी ते गुरुकुंज मोझरी पायी पालखी सोहळ्या गिरडमध्ये दाखल:मोठ्या उत्साहात स्वागत
समुद्रपूर:भु-वैकुंठ अड्याळ टेकडी येथून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही गीताचार्य तुकाराम दादा यांच्या मार्गदर्शनाखाली श्री गुरुदेव तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुकुंज मोझरीकडे जाणाऱ्या पायी पालखी सोहळ्याचा पारंपरिक मुक्काम गिरड येथे झाला.गेल्या ४५ वर्षांपासून अखंड चालत असलेली ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धा, भक्तीभाव आणि सामाजिक जाणिवेने साजरी होते. सुमारे २४२ किलोमीटर अंतराचा हा पायी प्रवास भक्तगण मोठ्या उत्साहाने पार करतात.यावेळी पालखीचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.