दि. 20 डिसेंबर रोजी शहरात नगर पालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान प्रक्रियेच्या दिवशी सकाळी 9:34 ते दुपारी 1:05 च्या दरम्यान नटराज टॉकीज येथे कॅम्पेनिंग बलून लावत तर इनानी मंगल कार्यालय मतदारांना पैश्याचे आमिष व गोरोबा मंदिर येथे देखील महिलाना पैश्यांचे आमिष दाखवत आदर्श आचार संहितेचा भंग झाला होता व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन झाले होते ह्या प्रकरणी फिर्यादी कदम यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार धर्माबाद पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.