नागपूर ग्रामीण: धक्कादायक, दिवाळीच्या दिवशीच सावळी येथील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या, नापिकी आणि कर्जाला कंटाळून मृत्यूला कवटाळले
दिवाळीच्या शुभमुहूर्तावरच सावळी गावात एक अत्यंत हृदय द्रावक आणि खळबळीजनात घटना घडली आहे. येथील एका तरुण शेतकऱ्याने सततच्या नापिकीला आणि कर्जाच्या वाढत्या बोजाला कंटाळून विष प्राशन करून आपली जीवन यात्रा संपविली. मृतकाचे नाव विलास ढोडरे वय 36 वर्ष असे सांगण्यात आले आहे. या शेतकऱ्याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे. प्राप्त माहितीनुसार दिवाळीच्या दिवशी विलास ने दोन मुलींसह त्यांच्या पत्नीला माहेरी सोडून दिले.व विष प्राशन केले.