दारव्हा: नगर परिषदेविरोधात मनसेचा संताप, करबिलांची होळी करून निषेध
दारव्हा नगर परिषदेच्या वाढीव कर, भ्रष्टाचार आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत सुविधांच्या अभावाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आज दि. ४ नोव्हेंबरला सकाळी अकरा वाजता नगर परिषदेसमोर आंदोलन छेडले. नगर परिषदेच्या करबिलांची होळी करून कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.