नांदुरा-मलकापूर महामार्गावरील बायोडिझेल पंपातील टाकी स्वच्छतेच्या धोकादायक कामादरम्यान तयार झालेल्या विषारी वायूने दोन मजुरांचा प्राण घेतलेल्या प्रकरणाला तपासादरम्यान नवे वळण मिळाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रशीदखाँ जमादार यांचे सुपुत्र जमील खाँ रशीदखाँ (४२) यांना नांदुरा पोलिसांनी २४ नोव्हेंबर रोजी मलकापूर येथून अटक केली आहे.