घनसावंगी: जांबसमर्थ येथे रस्त्यासाठी आमरण उपोषण ; रस्ता मोकळा करून देण्याची मागणी
जांबसमर्थ ता. घनसावंगी येथील गुणा नाईक तांडा ते जांबसमर्थ शासकीय सार्वजनिक सरकारी रस्त्याची शेतकऱ्यांची मोजणी फिस भरुन भुमि अभिलेख कार्यालय घनसावंगी यांच्याकडुन हद्दीखुणाचे काम पुर्ण करुन घेतले मात्र जांबसमर्थ येथील तलाठी व मंडळाधिकारी यांनी रस्ता आज रोजी पर्यंत मोकळा व खुला करुन न दिल्यामुळे त्यांच्यावर तात्काळ योग्य ती कार्यवाही करुन कायमस्वरुपी शासकीय सेवेतुन बडतर्फ करुन त्यांचे नावे काळ्या यादी मध्ये समाविष्ट करण्यात यावे यासाठी दि. 10/11/2025 चे आमरण उपोषण चालू आहे.