चोपडा येथे युतीचा तिढा अखेर सुटला असून भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे नगरपालिकेत एकत्र लढणार असल्याची अधिकृतपणे घोषणा रविवारी 16 नोव्हेंबर रोजी दुपारी 1 वाजता करण्यात आली. यात भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षपदाची जागा मिळणार आहे. अशी माहिती माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांनी दिली.