श्रीगोंदा: सभापती प्रा. राम शिंदेंच्या पाठपुराव्याला यश : श्रीगोंदा डेपोला मिळणार पाच नवीन बसेस
सभापती प्रा. राम शिंदेंच्या पाठपुराव्याला यश : श्रीगोंदा डेपोला मिळणार पाच नवीन बसेस श्रीगोंदा : विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे श्रीगोंदा बस डेपोला तब्बल पाच नवीन बसेस मिळणार आहेत. या निर्णयामुळे तालुक्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. भाजपचे कर्जत मंडल अध्यक्ष अनिल गदादे यांनी आज दुपारी तीन वाजता दिलेल्या माहितीनुसार, लवकरच या बसेस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत.