आर्वी: आमदार आपले दारी उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद विरुळ येथे 452 अर्ज झाले प्राप्त.. आमदार एसडिओ बीडिओ तहसीलदार आदीं उपस्थित
Arvi, Wardha | Sep 24, 2025 आमदार आपल्या दारी या लोकाभिमुख उपक्रमांतर्गत विरुळ आकाजी येथे आज दुपारी अकरा ते पाच वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज स्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते आमदार सुमित वानखडे यांनी या शिबिराचे उद्घाटन केले उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाठ तहसीलदार हरीश काळे गटविकास अधिकारी सुनीता मरसकोल्हे आणि इतर अधिकाऱ्यांची ही मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती या शिबिरात 452 अर्ज प्राप्त झाले सर्व सेवेचा नागरिकांना लाभ देण्यात आला..