उत्तर सोलापूर: महिलांनी कायद्याचे संरक्षण आणि योजनांचा लाभ घ्यावे :ॲड.स्नेहल राऊत :महिला विषयक कायदे कायदेविषयक कार्यशाळा संपन्न
मुलगी पोटात असल्या पासून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तिच्या संरक्षणासाठी कायदा खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा आहे. तसेच सरकारनेही प्रत्येक महीला मग ती आर्थिक, मानसिक, शारीरिक, सामाजिक, विधवा, परीत्यक्ता, वृध्द असेल तिला स्वयंसिद्धा बनवण्यासाठी सरकारी योजना आणल्या आहेत. तरीही अप्रिय व दुर्दैवी घटना महीलांबाबत घडत आहेत. त्यामुळे महिलांना त्यांच्या हक्कासाठी आणि संरक्षणासाठी जागरूक असणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन विधी सेवा प्राधिकरण मुख्य लोक अभिरेक्षक ॲडव्होकेट स्नेहल राऊत यांनी केले.