मावळ: वराळे येथे भरदिवसा चोरीचा कहर ; अवघ्या ४५ मिनिटांत केली लाखोंची चोरी
Mawal, Pune | Sep 22, 2025 भरदिवसा केवळ पाऊण तासाच्या अंतरात चोरट्यांनी तब्बल सात लाख ९९ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना गुरुवारी (दि. १८) मावळ तालुक्यातील वराळे येथे दुपारी पावणे तीन ते साडेतीन वाजताच्या दरम्यान घडली.याबाबत २५ वर्षीय महिलेने याबाबत तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.