समुद्रपूर: विद्यार्थ्यांनी घेतले आपत्ती निवारणाचे धडे:राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने दिले प्रशिक्षण
समुद्रपूर: आपत्तीच्या काळात नागरिकांनी घाबरून न जाता शांतीत आणि योग्य पद्धतीने प्रतिसाद देणे गरजेचे असते, याची जाणीव विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल यांच्या वतीने विकास विद्यालय, कनिष्ठ महाविद्यालय व एच.एस.व्ही.सी. महाविद्यालय समुद्रपूर येथे आपत्ती निवारण प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबिराचे उद्घाटन प्राचार्य शिरीष नेहरोत्रा यांनी केले. एस.एम.के. झेड पी. महाविद्यालयाचे प्राचार्य शंकर महाजन,, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी उपस्थित होते.