कुही: रेंगातूर-सिर्सी येथे विविध विकास कामांचे आमदार संजय मेश्राम यांच्या हस्ते भूमिपूजन
Kuhi, Nagpur | Sep 26, 2025 ग्रामीण भागात असलेल्या रेंगातूर- सिर्सी,पचखेडी येथे 26 सप्टेंबर शुक्रवारला दुपारी 2 वाजताच्या सुमारास उमरेड विधानसभाचे आमदार संजय मेश्राम यांच्या हस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले. प्रशासनाच्या वतीने व8विविध विकास कामे मंजूर करण्यात आले. सदर विविध विकास कामांचे भूमिपूजन आमदार संजय मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मनोज तितरमारे गावागावातील पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते.