वैजापूर: म्हस्की शिवारात ४ एकर ऊस जळून खाक
विद्युत तारांचे घर्षण होऊन स्पार्किंग मुळे ४ एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील म्हस्की शिवारात शुक्रवार ता.७ रोजी दुपारी दोन ते अडीच वाजेच्या सुमारास घडली.या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार म्हस्की शिवारातील गट क्रमांक ८० मध्ये अण्णासाहेब बाबुराव सोमवंशी व काशिनाथ देवराव सोमवंशी या दोघांनी प्रत्येकी २ एकर ऊस लावलेला होता दरम्यान शुक्रवार ता.७ रोजी दुपारच्या सुमारास अचानक उसाला आग लागली.या घटनेत ४ एकर ऊस जळून खाक झाला या घटनेमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.