श्रीगोंदा: "घरकुलासाठी जागा द्या श्रीगोंद्यातीलभटके विमुक्त, आदिवासी, दलित समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण.
"घरकुलासाठी जागा द्या!" भटके विमुक्त, आदिवासी, दलित समाजाचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. नगर (प्रतिनिधी)- श्रीगोंदा तालुक्यातील लिपणगाव नजीकच्या जोशी वस्ती येथे गेल्या ४० वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या जागेत वास्तव्यास असलेल्या भटके विमुक्त, आदिवासी व दलित समाजातील सुमारे ३५० कुटुंबांनी आपल्या हक्काच्या घरकुलासाठी जागा त्यांच्या नावावर करून सातबारा उतारा देण्यात यावा, तसेच जातीचे दाखले तातडीने देण्यात यावेत या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.