जामखेड: तीन कोटींचा पूल उदघटनाआधीच गेला वाहून. बोगस काम करणाऱ्यांवर कारवाईची मागणी.
जामखेड तालुक्यात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून शेतकरी हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन आणि इतर पिकं पाण्यात बुडाल्याने हतबल झाले आहेत. पंचनामे करून तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.तर दुसरीकडे शहरातील नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी दाकटी नदीवर बांधण्यात आलेला तब्बल तीन कोटी रुपयांचा लोखंडी पूल पहिल्याच पावसामध्ये कोसळला.उद्घाटन आधीच पूल वाहून गेल्याने कामाच्या दर्जा वर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित.