गोंदिया: शेतकऱ्यांकडून कोणतेही संमती स्वयंघोषणापत्र न घेता अहवाल सादर करा पालकमंत्री नाईक
शासन आणि माणुसकीच्या नात्याने आपण सर्व शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत बाधित शेतकऱ्यांना पुरेपूर मदत मिळावी यासाठी शासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले उपविभागीय अधिकारी सर्व तालुक्यातील तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना आठ दिवसात पंचनामे करून सरकारकडे अहवाल सादर करण्याचे तसेच शेतकऱ्यांकडून कोणतेही संमती पत्र अथवा स्वयंघोषणापत्र न घेता अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले