राहाता: लक्ष्मी पुजनावेळी साई मूर्तीला हिरेजडित सुवर्णाभुषणे तसेच विविध अलंकाराचा साज - शृंगार.
शिर्डी साईमंदिरात लक्ष्मी - कुबेर पुजन संपन्न झाले. यावेळी साई मूर्तीला हिरेजडित सुवर्णाभुषणे तसेच विविध अलंकाराचा साज शृंगार करण्यात आला होता. दरवर्षी प्रमाणे यंदाही लक्ष्मी पुजनानिमित्त साई मंदिरात लक्ष्मी कुबेर पूजा करण्यात आली. संस्थांनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली.