औंढा नागनाथ: लोहरा खुर्द येथे एकास कुऱ्हाडीने मारहाण 6 जणावर औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औंढा नागनाथ तालुक्यातील लोहरा खुर्द येथे आरोपीतांनी गैर कायद्याची मंडळी जमवून जुन्या रस्त्याच्या भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करत हातात कुऱ्हाड, विळा,रॉड, दगड घेऊन जीवे मारण्याच्या हेतूने फिर्यादीच्या मानेवर कुऱ्हाडीने मारून गंभीर जखमी केल्याची घडली. फिर्यादी आकाश काशीदे यांच्या फिर्यादीवरून राहुल काशीदे,खुदाजी काशीदे, गिरधारी काशीदे, सह इतर तिघांवर दिनांक 25 नोव्हेंबर मंगळवार रोजी दुपारी दीड वाजे दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी भेट दिली आहे