पाथरी तालुक्यातील गौंडगाव येथे महसूल विभागाची कारवाई छापा टाकून मोठ्या प्रमाणावरील अवैध रेती उत्खननाची सामग्री जप्त करून नष्ट केली. ही कारवाई पाथरीच्या उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण व तहसीलदार शंकर हंडेश्वर यांच्या मार्गदर्शनात नायब तहसीलदार धोपे, मंडळाधिकारी बागुल, तलाठी साजिद, तायनक, कोतवाल चव्हाण यांच्या पथकाने केली. या छाप्यात अवैध उत्खननासाठी वापरण्यात येणारे चार तराफे, पाईप, उपकरणे व इतर अन्य साहित्य जाळून नष्ट करण्यात आले. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी महसूल विभागाच्