रामटेक: उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट रितसर नसल्याने आरोग्याचा प्रश्न उपस्थित
Ramtek, Nagpur | Nov 1, 2025 रामटेक उपजिल्हा रुग्णालयातील निघणारा कचरा व वैद्यकीय कचरा अर्थात बायो वेस्ट वापरलेल्या सुया, सिरींज औषधाच्या बाटल्या, खोके, रॅपर हँडल ग्लोब्स आदींची रीतसर विल्हेवाट लावणे गरजेचे असताना तो परिसरातच उघड्यावर पसरलेला दिसतो. एवढेच नव्हे तर तो नियमानुसार नष्ट करण्यात येत नसून तो उघडावर सामान्य कचऱ्याप्रमाणे जाळला जात असल्याचा आरोप वाईल्ड लाईफ ऑर्गनायझेशन रामटेकचे अध्यक्ष राहुल कोठेकर यांनी शनिवार दि. 1 नोव्हेंबरला सायं. साडेचार वाजता च्या दरम्यान केला.