समुद्रपूर: गिरड सिर्सी रसत्यावर उभ्या ट्रकाला मागून कोळसा भरुन येणाऱ्या ट्रकची धडक: दुदैवाने जीवितहानी नाही
समुद्रपुर तालुक्यातील गिरड सिर्सी रसत्यावर शुक्रवारी १० मेला दुपारी २ वाजताच्या सुमारास उमरेडकडून कोळसा घेऊन येत असलेल्या ट्रक चालकाचे वाहनावरुन नियंत्रण सुटल्याने उभ्या असलेल्या ट्रकला मागून जबर धडकली दिली सुदैवाने या अपघातात कोणत्याही जीवितहानी झाली नसली तरी धडक देणाऱ्या ट्रकच्या कॅबिनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यावेळी ट्रकच्या कॅबिनेटमध्ये अडकलेल्या चालक व क्लिनरला उपस्थितांनी सुखरूप बाहेर काढले.