वर्धा: सुधारित पिकविमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा : जिल्हाधिकारी वान्मथी सी यांचे आवाहन
Wardha, Wardha | Jul 24, 2025 नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. अशा नुकसानीच्या प्रसंगी शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी शासनाने प्रधानमंत्री पिकविमा योजना सुरु केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या सुधारीत पिकविमा योजनेत मोठ्या प्रमाणावर सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी केले आहे.