अंजनगाव सुर्जी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सुरू झाली. ही प्रक्रिया दुपारी १:३० वाजेपर्यंत चालली असून संपूर्ण मतमोजणी शांततेत पार पडली.या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार इंजिनिअर अविनाश गायगोले यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आयेशा बानो रशीद खान यांचा १२४ मतांनी पराभव करून दणदणीत विजय मिळविला. दरम्यान,कमी मताधिक्याने पराभव झाल्यामुळे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुनर्मतमोजणीची मागणी लावून धरली