वडवणी: कवडगाव येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची खा. प्रणिती शिंदेंनी घेतली भेट
Wadwani, Beed | Oct 26, 2025 वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनंतर, त्यांच्या कुटुंबीयांची आज रविवार दि 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता, खा.प्रणिती शिंदे आणि काँग्रेस पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.यावेळी त्यांनी कुटुंबीयांशी संवाद साधून संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली.घटनेची सखोल चौकशी होऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खा. प्रणिती शिंदे यांनी केली.