कन्नड: 'पैसे घेऊन बर्बाद होऊ नका' — हर्षवर्धन जाधवांच्या नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर थेट संदेश
कन्नड नगर परिषद निवडणुकीच्या वेळी माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी आज दि नऊ नोव्हेंबर रोजी रात्री नऊ वाजता मतदारांना “पैसे घेऊ नका” असे ठाम आवाहन केले.त्यांनी सांगितले की काही लोक रजिस्टर घेऊन घराघरात फिरत आहेत आणि मंदिरात पैसे देऊन मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत.जनतेने अशा व्यवहारापासून सावध राहावे आणि प्रभावाखाली न येता प्रामाणिकपणे मतदान करावे, असे जाधव म्हणाले.आणि जे पैसे वाटप करणार आहर ते आणणार कुठून असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे.