आंबळे (ता. शिरुर) येथे जागा विक्रीस नकार दिल्याचा राग मनात धरुन एका ६० वर्षीय शेतकऱ्याला लोखंडी रॉडने अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील आंबळे गावात घडली आहे.या प्रकरणी संजय बाळासाहेब बेंद्रे याच्याविरुद्ध शिरुर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.